आर्थिक असुरक्षितता : एक आढावा समीक्षा फराकटे ०७ सप्टेंबर २०२०

कोविड – १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या ताळेबंदीत एक दृश्य सातत्याने आपल्याला भेटत राहिले ते म्हणजे विटलेल्या कपड्यात मिटलेल्या चेहऱ्याने आपल्या पोराबाळांसह हजारो मैल चालत किंवा मिळेल त्या वाहनाने आपल्या आयुष्याची पुंजी खर्चून प्रवास करणारे ‘मजूर’. त्यांच्या शहरात आणि वाटेवर होणाऱ्या हालअपेष्टा, मेहनतीने मिळवून खाणाऱ्यांना थोडकेसे अन्न मिळवण्यासाठी पसरावे लागलेले हात, तेही पुरेसे नसणे,…